On 12 February,2019 NSS Volunteers Organised The NSS Camp at Nimbhere village.

? Blog: http://cabtnss.blogspot.com/ Date: 12/02/2019 Activity No. 513 NSS camp at Nimbhere village प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीरास निंभेरे येथे प्रारंभ झाला.या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती संपतराव सिनारे,तर अध्यक्ष म्हणून विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे सदस्य ज्ञानदेव साबळे उपस्थित होते.या श्रमसंस्कार शिबीराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली.या वेळी या कार्यक्रमासाठी कृषी व संलग्नित महाविद्यालयांचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे,रा.से.यो.चे समन्वयक प्रा.प्रविण गायकर,निंभेरे चे उपसरपंच गणेश सांगळे,त्याचबरोबर निंभेरे ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना संपतराव सिनारे म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजनेचे हे कॕम्प समाजाला दिशादर्शक आहेत व याच्या माध्यमातून युवकांची शक्ती निश्चितपणे विधायक कार्यासाठी उपयोगी पडेल.कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून स्वयंसेवक विक्रमसिंह पासले याने राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट वा हेतू उपस्थितांसमोर मांडला.दिवसभर सर्व स्वयंसेवकांनी निंभेरे गावातील मंदिर परिसर,विविध महापुरुषांच्या पुतळा परिसरातील स्वच्छता,रस्ते व ग्रामपंचायत परिसर स्वच्छता तसेच लागवड केलेल्या वृक्षांची जोपासना व विशेष श्रमदानही केले. दुपारच्या सत्रामध्ये रा.से.यो.चे.कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांचे 'महात्मा गांधीचे ग्रामीण स्वराज्य' या विषयावर अतिशय प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न झाले,त्यातून त्यांनी गावांची पुनर्रचना कशी असावी याचे मार्गदर्शन केले .या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी मानसिक संतुलन बिघडेल आणि वेळेचा अपव्यय करणाऱ्या गेम्स न खेळण्याची शपथ घेतली. या पहिल्या दिवसाची सांगता स्वयंसेवकांनी स्वच्छता जनजागृती शिवारफेरी काढून केली.या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे सर्व स्तरातून कौतुक होताना आढळले. Coordinator: Prof. Pravin S. Gaikar

Comments

Popular posts from this blog

On 20 December 2019 NSS Volunteers Paid Homage to Sant Ghadge Maharaj on the eve of Death Anniversary

On 23 September 2019, Celebration of birth Anniversary of Dr.karmaveer Bhaurao Patil.

On 5 th may,2019 NSS Volunteers Celebrated the 87 birth Anniversary of Loknete Padma Bhushan Dr. Balasaheb Vikhe Patil.