लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

लोणी (प्रतिनिधी): लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
              यावेळी तृतीय वर्षातील विद्यार्थी व रा.से.यो.स्वयंसेवक  विक्रमसिंह पासले याने दोन्ही महापुरुषांचे देशप्रेम, दुरदृष्टी व त्याग आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांसमोर मांडला.तर केसरी व मराठा वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती व शिवजयंती व गणेश उत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांना एकोपा निर्माण करण्याचे काम केले तर चंद्रशेखर आझाद यांनी देशासाठी प्राण पणाला लावले असे प्रतिपादन स्वयंसेवक सचिन वाघ याने केले.
              यावेळी या कार्यक्रमासाठी संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे, रा.सो.यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर,प्रा.महेश चंद्रे,प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वरांजली गाढे,प्रा.सारिका पुलाटे, प्रा.मनीषा खर्डे आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका अवंतिका सानप हिने केले तर आभार दिप्ती शेळके हीने मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवक ओमप्रकाश शेटे,गोकुळ सातपुते,प्रतिक पवार,प्रतिभा कर्डिले,संचिता गवारे,स्नेहल सहाने,हरीष काळे,जयश्री भुसारे यांनी विशेष परिश्रम घेतले.



Comments

Comments

Popular posts from this blog

NSS Volunteer Selected for the Specia NSS Camp held at Chikhaldara Amravati .

On 30 April, 2019 College organised the Farewell function for NSS Volunteers batch 2017-18.

NSS Program Officer Prof.P.S.Gaikar Selected as a team manager for MPKV, Rahuri.