26July ,2019 कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील रासेयोचा ५०० वृक्षलागवड आणि संगोपन कार्यक्रम.


कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील रासेयोचा ५०० वृक्षलागवड आणि संगोपन कार्यक्रम.

लोणी (प्रतिनिधी): पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंगोपन केले पाहिजे, वृक्षांमुळे शुद्ध हवा मिळते तसेच प्रदूषण रोखले जाते, आजारांपासून बचाव: दम्याची शक्यता ३३% कमी होते, हवा शुद्ध करून फुप्फुसाचा बचाव करते अश्या विविध फायदे होतात म्हणून वृक्षसांगोपान होणे गरजेचे आहे असे वक्तव्य कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांनी केले....

वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे ही   प्रत्येक नागरिकाची जाबाबदारी आहे आणि प्रत्येकाने ती स्वीकारली पाहिजे, कृषीजैव तंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम हाती घेतला हे खूप कौतुकास्पद आहे अशे मत राहता कृषि मंडळ अधिकारी श्री. नारायण लोळगे यांनी व्यक्त केले...

मानवाने विकासासाठी निसर्गाचा केलेला ऱ्हास आणि पर्यायाने झालेला   निसर्गाचा ढासळलेला समतोल रोखण्यासाठी तसेच मानव जातीच्या उज्वल भविष्यासाठी पृथ्वीला तिचे गेलेले वैभव पुन्हा मिळवून दिले पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या वृक्षारोपण अभियानात सहभागी होऊन लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांच्या संकल्पनेतून रासयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांच्या मार्गदशनखाली एक विद्यार्थी एक झाड असा उपक्रम हाती घेऊन गोगलगाव रोड येथील परिसरात ५०० झाडांची  लागवड करण्यात आली...

यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, संचालक श्री. दिघे साहेब,लोणी खुर्द गावच्या सरपंच मनीषा आहेर,  उपसरपंच श्री. सुवर्णा घोगरे,ग्रामविकास अधिकारी श्री.संतोष ठिगळे,कामगार तलाठी श्री.कोळगे साहेब,सामाजिक वाणीकरणाचे फॉरेस्ट रेंज अधिकारी श्री.बबनराव फटांगरे,  तालुका कृषि मंडळ अधिकारी नारायण लोळगे,कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,सर्व शिक्षक वृंद आणि रासेयो चे स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.विशाल, केदारी,प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.मिनल शेळके,प्रा.स्वरांजली गाढे,प्रा.सारिका पुलाटे, प्रा.मनीषा आदिक, प्रा.श्रद्धा रणपिसे, रा.सो.यो चे सर्व स्वयंसेवक आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले...

Comments

Popular posts from this blog

NSS Volunteer Selected for the Specia NSS Camp held at Chikhaldara Amravati .

NSS Program Officer Prof.P.S.Gaikar Selected as a team manager for MPKV, Rahuri.

On 23 January, 2020 NSS Volunteers Celebrated the birth Anniversary of Netaji Subhaschandra Bose.