On 26 July 2019 College of Agricultural biotechnology Loni And NSS Volunteers celebrated Kargil Vijay Diwas.
- Get link
- X
- Other Apps
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात कारगिल विजय दिवस
Friday, July 26, 2019
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा
लोणी (प्रतिनिधी): लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या कारगील युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली व विजयाची निशाणी म्हणून हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो.
या वेळी या कार्यक्रम प्रसंगी बोलताना कृषी शिक्षण संचालक डॉ.मधूकर खेतमाळस यांनी कारगिल विजय दिवस हा आपल्या सैन्याच्या शौर्य, वीरता, पराक्रम आणि बलिदानाचे प्रतिक आहे, कारगिलमध्ये सुमारे दोन महिने चाललेल्या या युद्धात भारतीय सैन्याने कारगीलची शिखरं ताब्यात घेऊन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांना हकलून लावले होते व खरे पाहता हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करतोय याचा अभिमान वाटतोय असे मत व्यक्त केले.तसेच स्वयंसेवक संचिता गवारे हीने आपल्या मनोगतातून त्यावेळी झालेल्या युद्धप्रसंगाचे रोमांचकारक वर्णन उपस्थितांसमोर मांडले.
यावेळी संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे,रा.सो.यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वयंसेवक ऋतिक गागरे याने केले तर आभार दिप्ती शेळके हीने मानले.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी
- विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी ज्या वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारताला विजयी केले त्या शहीद वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment